नवी दिल्ली : देशातील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारकडून नवीन श्रम संहिता (New Labour Code) लागू करण्यात येणार आहे. या नव्या संहितेमुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांना आता अधिक फायदा होणार आहे. नवीन श्रम संहितेचा एक भाग असलेला सामाजिक सुरक्षा कायदादेखील संमत करण्यात आला असून या सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मोठा फायदा होणार आहे.

भारतातील बहुतांशी राज्यांनी यावर सहमती दर्शवली आहे. नवीन श्रम कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. या नव्या कायद्यात कर्मचारी, कामगारांना सामाजिक सुरक्षा, लैंगिक समानता, कल्याणकारी योजनांचा फायदा होणार आहे.

भारत सरकारने कामगार क्षेत्राला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चार श्रम संहिता पारित केल्या आहेत. या नव्या संहितेत या तीन मुद्यांवर भर देण्यात आलेला आहे. यात कायमस्वरूपी कामगार आणि कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे. या नव्या संहितेनुसार कामगार आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षाही मिळणार आहे. तसेच या संहितेत लैंगिक समानता पाळली जाणार आहे. महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित आणि उत्तम वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

Himachan Pradesh Exit Poll: हिमाचलमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’; भाजप सत्ता राखणार का?
अशी मिळणार सुविधा

> महिलांना मातृत्वात लाभ मिळणार
> बालसंगोपनासाठीच्या सुविधा मिळणार
> रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचारी कामगारांना मिळणार फायदा.
> समान पातळीवर मिळणार कामाचा मोबदला.
> महिला आणि पुरुषांच्या कामाच्या मोबदल्यात लिंगआधारीत भेदभाव असणार नाही.
> कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव नष्ट करून त्यात आणखी समानता आणण्याचा होणार प्रयत्न.

बैलगाडा शर्यत आली अंगलट! प्रेक्षकांची आरडाओरड, बैल गोंधळले, रनवे सोडून थेट शेतात ठोकली धूम
कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

> ‘कर्मचारी-कामगार’ या शब्दाच्या व्याख्येत असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा समावेश.
> कर्मचारी, कामगारांना मिळणार भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्यूएटीचे फायदे.
> लहान उद्योग, कंपन्या राज्य कामगार विमा योजनेत (ESI) येणार.
> जोखीम असलेल्या उद्योगांनादेखील ESI मध्ये होणार समावेश.

अमरावतीत १०० हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा, अचानक होऊ लागल्या उलट्या, अतिसाराचा त्रास
कामगार, कर्मचाऱ्यांना असा होणार फायदा –

> कर्मचार्‍याकडे निवृत्तीवेळी अधिक पैसे राहणार शिल्लक.
> कामगार, कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी जमा झालेले पैसे वाढणार.
> नव्या बदलानुसार पीएफ आणि ग्रॅज्यूटीमधील हिस्सा कंपनीला ठरवावा लागणार.
> मूळ पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भत्ते असणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here