नवी दिल्लीः भारतीय हवाई दलासाठी २९ जुलै हा दिवस मोठा आणि खास ठरणार आहे. कारण या दिवशी ५ राफेल लढाऊ विमानं भारताला सोपवण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ही विमानं अंबाला येथील तळावर हवाई दलात दाखल केली जाणार आहेत. २९ जुलैला हवामानाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण सध्या उ्तर भारतात पाऊस पडतोय. यामुळे हवामानकडेही हवाई दलाचे लक्ष असेल.

५ राफेल विमानं २९ जुलै रोजी भारतात येणार

२९ जुलैला हवाई दलात समाविष्ट झाल्यानंतर राफेल विमानांना २० ऑगस्ट रोजी एका समारंभात हवाई दलात केले जाईल.

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घेतले सखोल प्रशिक्षण

राफेल विमानातील तांत्रिक गुंतागुंत समजण्यासाठी या विमानाचे सोखल प्रशिक्षण घेतले आहे. हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी या लढाऊ विमानाच्या उच्च मारक क्षमतेचा सखोल अभ्यास केला आहे. यामुळे राफेल विमानावर काम करण्यास ते पूर्णपणे तयार आहेत. राफेल विमान दाखल होताच ते विमान लवकरात लवकर ऑपरेशनल स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, म्हणजेच या विमानाचा उपयोग वेगवेगळ्या उद्देशांसाठी करता येईल, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुढच्या २ वर्षांत भारताला ३६ राफेल मिळणार

भारताने फ्रान्ससोबत राफेल विमान खरेदीचा व्यवहार केल आहे. राफेलची दोन स्क्वॉड्रन भारत फ्रान्सकडून घेणार आहे. दोन स्क्वॉड्रन म्हणजे एकूण ३६ विमानं. पहिले स्क्वॉड्रन हे अंबाला येथे तळावर पश्चिम विभागासाठी तैनात केले जाईल. तर दुसरे स्क्वॉड्रन हे पश्चिम बंगालच्या हाशीमारा हवाई तळावर तैनात करण्यात येईल. चीन कुठल्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी ही विमानं तैनात असतील, अशी माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.

पोटेंट मेट्योर आणि स्कॅल्प मिसाइल प्रणालीने सज्ज

हे पोटेंट मेट्योर आणि स्कॅल्प मिसाइल प्रणालीने सज्ज आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची मारक क्षमता व्यापक होणार आहे. मेट्योर सिस्टमने शत्रूवर हवेतून हवेत मारा करण्याचे तंत्र आहे. तर स्कॅल्प हे लांब पल्ल्याचे क्रूझ मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र फक्त या विमानावरून सोडता येऊ शकते. हे मिसाइल शत्रूच्या स्थिर आणि गतीशील लक्ष्यांना आतपर्यंत जाऊन भेदू शकते.

भारताच्या गरजेनुसार बदल

राफेल लढाऊ विमानात भारताच्या गरजेनुसार आणखी बरेच बदल आणि सुधारणा करण्यात आली आहे. या वैशिष्ट्यांबाबत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना केवळ ऑपरेशनल माहितीच दिली गेली नाही तर देखभाल आणि दुरुस्तीबद्दलही सांगितले गेले आहे.

५९००० कोटींची डील

भारत सरकारने २०१६ मध्ये फ्रान्स सरकारशी ५९००० कोटींचा मोठा व्यवहार केला आहे. यात भारताला फ्रान्सकडून ३६ राफेल विमानं लढाऊ विमानं मिळणार आहेत. राफेल खरेदी करारावरून देशाच्या राजकारणात भूकंप झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा जास्त किंमतीत ही विमानं खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here