नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित करण्यात आला होता. या काळात खासदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. लॉकडाउन दरम्यान राहुल गांधींनी () आपले मुद्दे ट्विट आणि व्हिडिओद्वारे मांडले आणि केंद्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. पण एक गोष्टी तुम्ही लक्षात आली असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बदललेला आपला लुक. या नव्या लुकमध्ये राहुल गांधी तरुण दिसण्याऐवजी प्रौढ दिसत आहेत. लॉकडाउन दरम्यान समोर आलेल्या त्यांच्या फोटोंमध्ये त्यांचे पांढरे केस दिसू लागलेत. एवढचं नव्हे तर हेअर स्टाइल आणि ड्रेस देखील बदलला आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री म्हणजे १७ जुलैला एक ट्विट केले होते. त्यात त्यांचा व्हिडिओ होता. हाच व्हिडिओ राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा पोस्ट केला. केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर टीका करताना ते या व्हिडिओत दिसून आले. व्हिडिओत राहुल गांधी यांचे केस वाढलेले आणि कुरळे झालेले दिसत आहेत. आणि चेहऱ्यावर बारीक दाढीही दिसतेय.

राहुल गांधी यांनी एक आठवड्यापूर्वी १० जुलैला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांचा लुक काहीसा वेगळा होता. या व्हिडिओ राहुल गांधींनी पूर्ण दाढी केल्याचे दिसून आलं आणि डोक्यावरील केसही बारीक होते.

३० जूननंतर राहुल गांधी यांनी भारतीय नर्सेसशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. डोक्यावरील त्यांचे केस काहिसे कुरळे दिसून आले.

तीन वर्षापूर्वीही बदलला होता लुक

तीन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी आपला लुक बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ते आपले वडील आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींसारखे बंद गळ्याचा कोट घालून दिसून आले होते. त्यात ते वडिलांसारखे दिसत होते.

राहुल गांधींच्या नव्या लुकवरून ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सात दिवसांता एकता लुक कसा काय बदलू शकतो. एका आठवड्यात डोक्यावर कुरळे केस आले आहेत, असं प्रश्न युजर्सकडून उपस्थित केले जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here