राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जमलेल्या अनेकांचा हिरमोड, दापोलीत नेमकं काय घडलं? – at dapoli raj thackeray left without any interaction with those gathered to welcome him
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे दापोली दौऱ्यावर येणार म्हणून त्यांच्या मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती. सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे दापोली शहरात येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य नागरिक राज ठाकरेंना पाहण्यासाठी भेटण्यासाठी ते बोलतात ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र, राज ठाकरेंनी अशी कोणतीही भेट व वेळ न देता केवळ गाडीबाहेर येऊन पुढील सीटच्या डोअरमधून बाहेर आले नमस्कार केला आणि पुन्हा कारमध्ये बसले व निघून गेले. राज ठाकरेंची भेट न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. इथे असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते थांबतील असा अंदाज होता. पण तोही अनेकांचा अंदाज राज ठाकरे यांनी चुकवला आहे. ती संधी राहुल गांधींनी साधली नाही; ईव्हीएमबाबत संविधान समर्थक दल काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंना भेटणार जवळपास एक ते दोन तास दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या केळस्कर नाका परिसरात संध्याकाळी पाच वाजल्यापासून असंख्य पदाधिकारी आणि नागरीक थांबून होते. त्यांचे स्वागत करून फटाकांच्या आतषबाजी करत फटक्यांची माळ लावण्याची तयारी ठेवली होती. पण राज ठाकरे यांनी गाडीतून खाली न उतरताच गाडीतूनच हात जोडून नमस्कार करत ते पुढे निघून गेले.
राज ठाकरेंच्या स्वागतासाठी अनेक पदाधिकारी, नागरिक सज्ज होते. असंख्य कार्यकर्ते व असंख्य नागरिक राज ठाकरे यांना भेटतील राज ठाकरेंना पाहता येईल, ते काय बोलतात ते ऐकता येईल यासाठी सायंकाळीपासून त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. पण अनेकांचा भ्रमनिरास झाला. राज ठाकरेंचा ताफा संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दाखल झाला. यावेळी राज ठाकरेंनी गाडीतूनच नमस्कार केला व काही क्षण ते थांबले. गाडीचं दार उघडलं त्यांनी उतरून फुटपॅड उभे राहिले, हात जोडून मोठा नमस्कार केला अभिवादन केलं व ते पुन्हा गाडीत बसले आणि पुढे मार्गस्थ झाले. यामुळे उपस्थित नागरिकांचा मात्र हिरमोड झाला आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे.