Authored by निलेश झाडे | Edited by मानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Dec 2022, 9:55 am

Chandrpur News Today: ब्रम्हपुरी येथील नविन कोर्टाच्या इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

chandrpur
चंद्रपूरः ब्रम्हपुरी येथील नविन कोर्टाच्या इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे ( २७ ) असे मृतक मुलीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले. (Chandrpur News Today)

प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह सापडून आला. पहाटेच्या सुमारास गेटवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

वाचाः पुण्यातील दरे पुलावर मध्यरात्री ट्रेलरचा विचित्र अपघात; चालक आतमध्येच अडकला अन्…

तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात येणाऱ्या कोरेगाव (चोप) गावातील रहिवाशी आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे असे तरुणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे. न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेतल्याने शहरात चर्चांना पेव फुटला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.

वाचाः पुणेः सतत संशय घ्यायचा, नंतर दोघांमधले वाद टोकाला गेला; इंजिनीअरने पत्नीला कायमचे संपवले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here