बाजाराची सुरुवात
आज बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ४३९.०५ अंक म्हणजेच ०.७० टक्क्यांच्या घसरणीसह ६२,३९५.५५ वर उघडला. याशिवाय, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक, निफ्टी १००.४० अंक किंवा ०.५४ टक्क्यांच्या घसरणीसह १८,६००.६५ वर उघडला आहे.
कोणते शेअर्स वधारले
आज सेन्सेक्समधील ३० पैकी ७ समभाग तेजीसह व्यवहार करत असून २३ समभागांमध्ये घसरण होत आहे. तसेच आजच्या वधारलेल्या समभागांवर नजर टाकली तर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचयूएल, अॅक्सिस बँक आणि एसबीआयचे समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत.
कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?
एनएसई निफ्टीवर, हिंदाल्कोच्या समभागांमध्ये सर्वाधिक १.७६ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय एचसीएल टेक, टाटा स्टील, इन्फोसिस आणि पॉवरग्रीडमध्ये सर्वाधिक घट नोंदवण्यात आली. याशिवाय वधारललेया शेअर्सबद्दल बोलायचे तर मंगळवारी, एसबीआय लाईफचे शेअर्स एनएसई निफ्टीवर ०.८० टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे एचडीएफसी लाइफ, कोल इंडिया, बीपीसीएल आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.
आशियाई बाजारातही घसरण
अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे मंगळवारी आशियाई शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. यूएसमधील सेवा क्षेत्राच्या अनपेक्षितपणे मजबूत डेटामुळे, फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली.
नकारात्मक ओपनिंगचे मिळाले संकेत
सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स ६१ अंकांनी किंवा ०.३२ टक्क्यांनी घसरून १८,७४९ अंकांवर व्यवहार करत होता. यावरून मंगळवारी देशांतर्गत बाजाराची नकारात्मक नकारात्मक होणार असल्याचे संकेत मिळाले.
रुपया पुन्हा ८२ च्या पुढे
दरम्यान, रुप्याच्याच्या तुलनेत अमेरिकन डॉलर पुन्हा एकदा वरचढ ठरला आहे. मंगळवारी रुपया २४ पैशांनी घसरला आणि पुन्हा एकदा ८२ चा स्तर ओलांडला. मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.०९ वर पोहोचला.