नवी दिल्ली: डिसेंबरच्या सुरुवातीलाच भारतासाठी परदेशातून चांगली बातमी समोर आली आहे. भारताचे आवडते कच्चे तेल, ब्रेंटच्या किमतीत सुमारे साडेतीन टक्क्यांनी मोठी घसरण झाली असून ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल ८३ डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. त्याच वेळी, अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७७ डॉलरच्या खाली आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार क्रूड ऑइलच्या किमती स्वस्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे यूएस सेवा क्षेत्राचा अंदाज, ज्यामध्ये म्हटले आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह आपल्या धोरणात कठोरता राखू शकते. म्हणजेच यूएस फेड पुन्हा व्याजदरात मोठी वाढ करू शकते.

तेल उत्पादक देशांचा मोठा निर्णय, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजची किंमत
विदेशी बाजारात कच्च्या तेलाचे दर
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बिझनेस सत्रादरम्यान यूएस सर्व्हिस सेक्टरचे अंदाज आले, त्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात पुन्हा भीती निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली. मागणी कमी असल्याने कच्च्या तेलाच्या किमती सुमारे साडेतीन टक्क्यांनी घसरल्या. आकडेवारीनुसार, ट्रेडिंग सत्रादरम्यान ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत सुमारे तीन डॉलरने घसरून प्रति बॅरल ८२.६८ डॉलरवर आली आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय सुमारे ४ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७६.९३ डॉलरवर आला. एक दिवसापूर्वी ब्रेंट प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ पोहोचला आणि डब्ल्यूटीआयच्या किमती प्रति बॅरल ८२ डॉलरचा टप्पा ओलांडला.

वाहनधारकांसाठी गुड न्यूज… पेट्रोल-डिझेलचे भाव घटणार? इंधन दरांबाबत मत्त्वाचे अपडेट
ब्रेंट स्वस्त, भारताला फायदा
भारत सर्वाधिक ब्रेंट कच्च्या तेलाची आयात करतो. यामागचे कारण म्हणजे ब्रेंट क्रूड तेलाचा दर्जा अमेरिकन तेलापेक्षा खूप चांगला असतो आणि त्याच्या शुद्धीकरण खर्चही जास्त नाही. त्यामुळे भारत प्रामुख्याने आखाती देशांमधून ब्रेंट क्रूड तेल आयात करवतो. दरम्यान ब्रेंट क्रूड ऑईल स्वस्त झाल्याचा थेट फायदा भारताला मिळेल असे समजू नका. सर्वात मोठा फायदा म्हणजे देशाचे आयात बिल कमी होईल आणि त्याच वेळी भारताला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

दुबई नव्हे; या देशातून होते भारतात सोन्याची सर्वाधिक तस्करी, वर्षभरात ८०० अधिक किलोचे सोने जप्त
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?
मे महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मार्चपासून सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. नुकसानाची भरपाई केली जात आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना कच्च्या तेलात कपातीचा लाभ दिला जात नाही, असे सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे. याशिवाय तेलाच्या कमी किमतीचा फायदा नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये दिसून येईल. देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांची कपात केली जाऊ शकते.

फेडचे धोरण काय असणार?
फेडने त्यांच्या आगामी पॉलिसी रेटमध्ये थोडी नरमाई घेणार असल्याचे यापूर्वी संकेत दिले. डिसेंबरमध्ये होणार्‍या फेड पॉलिसी व्याजदरात ५० बेस पॉइंट्सची वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर गेल्या चार वेळा ७५ बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली होती. पण यावेळी विशेष बाब म्हणजे डिसेंबरमध्ये पॉलिसी रेट जाहीर करण्याची भारताची पहिली पाळी आहे. म्हणजेच, आरबीआय प्रथम त्यांचे व्याजदर जाहीर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here