कोणाला वाटलं देखील नाही १४ वर्षापूर्वी घेतलेलं कर्ज आज…; प्रणय रॉय यांच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी
एनडीटीव्हीच्या भागधारकांनी शनिवारी म्हणजेच ४ डिसेंबर २०२२ रोजी अदानी समूहाला सुमारे ५३ लाख शेअर्स ऑफर केले होते. तर अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के भागीदारी एका छोट्या कंपनीचे अधिग्रहण करत मिळवली होती. त्यानंतर समूहाने मीडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना खुली (ओपन) ऑफर दिली, जी ५ डिसेंबर म्हणजे सोमवारी रोजी बंद झाली. आता अदानी ग्रुप मीडिया कंपनीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर बनला असून ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा अधिकारही त्यांना मिळणार आहे.
एनडीटीव्हीचे शेअर्स
एनडीटीव्हीचे शेअर्स सोमवारी प्रत्येकी ३९३.९० रुपयांवर बंद झाले, जे ऑफर किंमतीपेक्षा सुमारे ३४ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या तीन महिन्यांत ५ सप्टेंबर २०२२ रोजी एनडीटीव्ही समभागांनी ५४०.८५ रुपयांचा उच्चांक गाठला. आपल्या ओपन ऑफरमध्ये एनडीटीव्हीमधील कॉर्पोरेट गुंतवणूकदारांनी सर्वाधिक ३.९३ दशलक्ष शेअर्सची ऑफर दिली, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.७ दशलक्ष आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी ०.६८ दशलक्ष समभागांची ऑफर दिली.
एनडीटीव्ही अदानींच्या ताब्यात
अदानी समूहाच्या खुल्या ऑफरपूर्वी कंपनीतील सर्वात मोठे भागधारक संस्थापक-प्रवर्तक राधिका आणि प्रणॉय रॉय होते, ज्यांचे ६१.४५ टक्के हिस्सेदारी होती. यामध्ये एनडीटीव्हीची प्रवर्तक संस्था RRPR होल्डिंगच्या २९.१८ टक्क्यांचा समावेश होता, जो अदानी समूहाने ऑगस्टमध्ये अप्रत्यक्षपणे विकत घेतला. या टेकओव्हरनंतर एनडीटीव्हीमधील आणखी २६ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी अदानींनी खुली ऑफर दिली होती. दरम्यान, रॉय दाम्पत्याने आरआरपीआर बोर्डाने राजीनामा दिल्याची एनडीटीव्हीने गेल्या आठवड्यात घोषणा केली पण ते न्यूज कंपनीच्या बोर्डावर राहतील असे सांगितले.