‘सोहळ्याचे निमंत्रण येईल की, नाही माहीत नाही. तो काही आमच्या मानापनाचा विषय नाही, कारण आमचे नाते थेट श्रीरामाशी जोडलेले आहे,’ अशी समजंस भूमिका शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मांडलेली असताना, ‘अयोध्येला जाण्यासाठी पक्षप्रमुख यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही,’ असे वक्तव्य शिवसेना खासदार यांनी सोमवारी केली. पक्षाचे एक खासदार सर्व राजकारण बाजूला ठेवत समजंस भूमिका मांडत असताना, अन्य खासदार विनाकारण आक्रमक भूमिका मांडत राजकारण करीत असल्याबाबत आता शिवसेनेमधूनच नाराजीचा सूर आळवला जात आहे.
वाचा:
अयोध्येत राममंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील तारीख भूमिपूजनासाठी निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार किंवा कसे याविषयावर रविवारी खासदार अरविंद सावंत यांनी सविस्तर भूमिका मांडली. निमंत्रण देण्याचे काम आयोजकांचे असून, निमंत्रण आल्यानंतर स्वतः जायचे की प्रतिनिधी म्हणून अन्य कोणाला पाठवायचे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. प्रभू रामचंद्र हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्याला राजकारणाचा रंग देण्याची गरज नाही. पण, राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे हे लक्षात घ्यायला हवे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेले होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी पाच कोटींची देणगी देणारी शिवसेना ही देशातील पहिली संघटना आहे, असेही खा. सावंत यांनी सांगत शिवसेनेचे महत्त्व अधोरेखित केले होते.
वाचा:
मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खा. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नसल्याचे म्हटले आहे. अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असेही राऊत म्हणाले. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेतीलच काही ज्येष्ठ नेते मंडळी, ‘राऊत विनाकारण प्रत्येक गोष्टीमध्ये आक्रमकता आणून पक्षप्रमुखांच्या अडचणी वाढवत आहेत,’ असे मत व्यक्त करू लागली आहेत. अरविंद सावंत यांनी समंजस आणि समतोल भूमिका मांडली असताना विनाकारण या विषयात आक्रमता आणण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लावण्याची काहीच गरज नसल्याचे मतही एका शिवसेना नेत्याने व्यक्त केले.
लढाई देवाच्या आशीर्वादाने…
राममंदिर भूमिपूजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, करोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातले डॉक्टर आहेत ते लढत आहेत. तेवढेच आम्ही सांगू शकतो. प्रत्येकाची धर्मावर-देवावर श्रद्धा कायम असते. पण शेवटी उद्धव ठाकरे देखील सांगतील आणि पंतप्रधानही कबूल करतील आणि सगळेच कबूल करतील या देशातलेच नाही, तर जगातले डॉक्टर, पोलिस, परिचारिका या सगळ्यांनी बलिदान केले आहे. ही लढाई तेच लढतील देवाच्या आशीर्वादाने.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. Metropol Halı Karaca Halı Öztekin ve Selçuklu Halı Cami Halısı ve Cami Halıları Türkiye’nin En Büyük Cami Halısı Fabrikasıyız…