मुंबई- ज्येष्ठ रंगकर्मी यांचं वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. यासोबतच अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सुखटणकरांच्या निधनाने रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे.