२० वर्षात किती भाव वाढला
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना कसे श्रीमंत केले याचा अंदाज २० वर्षात शेअर्सच्या किमतीत झालेली उसळी पाहून लावता येईल. आकडेवारीनुसार कोटक महिंद्रा स्टॉकची किंमत २००१-०२ मध्ये सुमारे १.७० रुपये होती, परंतु २०२२ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत शेअरचा भाव १,९३४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.
तज्ञांचा सल्ला
सोप्प्या शब्दांत बोलायचे तर, ज्या गुंतवणूकदाराने २० वर्षांपूर्वी दीर्घ मुदतीसाठी बँकेच्या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते ते आज ११ कोटींहून अधिक वाढले असते. म्हणजेच कोटक महिंद्राच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या शेअर्सबद्दल बाजार तज्ञांचे मतही सकारात्मक आहे आणि त्यांना याला ‘बाय’ रेटिंग देत आहेत, त्यात आणखी वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.
बाजाराच्या घसरणीत शेअर वधारला
गेल्या आठवड्यातील ऐतिहासिक तेजीनंतर सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि दोन्ही निर्देशांक व्यवहाराच्या शेवटी लाल चिन्हावर बंद झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर, बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स अखेर ३३.९ अंक म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी घसरून ६२,८३४.६० अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ४.९५ अंक म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी घसरून १८,७०१.०५ च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. शेअरची किंमत ३.०५ रुपयांनी वाढून १,९२२.८५ रुपये झाली आहे.
सप्टेंबर तिमाहीत नफा वाढला
कोटक महिंद्रा बँक, एक वित्तीय सेवा समूह आहे, जी किरकोळ बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, गुंतवणूक बँकिंग आणि स्टॉक ब्रोकिंगसह इतर सेवा प्रदान करतो. यापूर्वी बँकेने जाहीर केलेल्या तिमाही निकालांवर नजर टाकल्यास चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा निव्वळ नफा सुमारे २७% वाढून रु. २,५८१ कोटी झाला आहे. यासोबतच बँकेच्या उत्पन्नातही जोरदार वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते ८,४०८ कोटी रुपयांवरून १०,०४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(टीप: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)