मिस्त्री यांच्या कारला ज्या भागात अपघात झाला, तिथल्या रस्त्याची रचना सदोष असल्याचं तपासातून समोर आलं होतं. त्यामुळेच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तिथे क्रॅश कुशन लावलं आहे. क्रॅश कुशनला कार धडकल्यास कारचं नुकसान कमी होतं. त्यामुळे वाहनांमधील प्रवाशांचा जीव वाचतो. अशाच प्रकारच्या उपाययोजना नद्यांवरील इतर पुलांवरही करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मानस आहे.
४ सप्टेंबरला टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांच्या कारला चारोटी डहाणू येथे अपघात झाला. अपघातात चार जणांचा अपघात झाला. त्यांनी सीट बेल्ट घातले नसल्याचं तपासातून उघडकीस आलं. पोलीस, आरटीओ आणि कार निर्मिती कंपनी मर्सिडीजसह अन्य शासकीय यंत्रणांनी अपघाताचा तपास केला.
डॉ. अनाहिता पांडोळे मर्सिडीज कार चालवत होत्या. त्यादेखील अपघातात जबर जखमी झाल्या. त्यांच्याविरोधात ५ कासा पोलीस स्थानकात वेगमर्यादा ओलांडल्याचा, कार चालवताना हलगर्जीपणा केल्याचा आणि चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सूर्या नदीवरील पुलावर सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याचं, चालकांना धोक्याचा इशारा देणारे फलक नसल्याचं तपासातून समोर आलं होतं.