Maharashtra Vs Karnataka | दे-फडणवीस सरकारमधील मंत्री गनिमी काव्याने बेळगावमध्ये शिरतील, या भीतीने कर्नाटक सरकारकडून सीमारेषेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये, असे सांगितले होते. त्यामुळे कर्नाटक पोलीस सीमारेषेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.

हायलाइट्स:
- कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
- महाराष्ट्र पासिंगच्या जवळपास सहा ट्रक्सवर दगडफेक
- बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ राडा
या प्रकारानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केले आहे. राज्यातील सरकार दुर्बल असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. हा हल्ला म्हणजे राज्य सरकारचे अपयश आहे. कर्नाटकमध्ये अशीच दादागिरी सुरु राहिली तर महाराष्ट्रातही कर्नाटकची ५ लाख ५० हजार वाहने आहेत, हे लक्षात असू द्या, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार
देवेंद्र फडणवीसांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन
बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केला. बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
मोठी बातमी: सीमावाद चिघळला, नाक्यावर तब्बल २ हजार पोलिसांचा कडक पहारा; मंत्र्यांचा दौरा लांबणीवर
गनिमी काव्याच्या भीतीने कर्नाटक बॉर्डरवर पोलिसांची फिल्डिंग
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गनिमी काव्याने बेळगावमध्ये शिरतील, या भीतीने कर्नाटक सरकारकडून सीमारेषेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यांवर दोन हजार पोलीस तळ ठोकून आहेत. ६ डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.