मुंबई: एक दिवस असा येईल की जगातून पुरुष आणि महिला यांच्यातील भेदभाव संपून जातील. कारण पृथ्वीवर पुरुषच नसतील, केवळ महिला असतील. जगातील पुरुष संपल्यावर मग पुढच्या पिढीचं काय? महिला आणि पुरुष मिळून पुढील पिढी तयार करतात? प्रजननातून पुढील तयार होते. पण पुरुषच नसतील तर मग पुढच्या पिढीचं काय? माणसांचं अस्तित्वच संपुष्टात येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण मानवांसह अनेक सस्तन प्राण्यांमधील वाय क्रोमोझोम संपत आहे.

माणसांमधील वाय क्रोमोझोम हळूहळू संपत आहे. त्यामुळे एक वेळ अशी येईल की मुलं जन्मालाच येणार नाहीत. फक्त मुलीच जन्माला येतील. मुलंच जन्माला येणार नसतील, मग त्यांच्या जागी कोणता जीव जन्माला येणार? नवीन लिंग विकसित होणार का? हे प्रश्न उपस्थित होतात. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स जर्नलमध्ये यासंबंधी एक शोध अहवाल प्रसिद्ध झाला आहे. नरांना जन्म घालणारी जीन्स संपत असल्याची माहिती यामध्ये आहे.
सगळ्यात महागडा खटला LIVE पाहिला; ‘ती’ केस बघून आफताबचा दिल्ली, मुंबई पोलिसांना गुंगारा
सस्तन प्राण्यांमधील माद्यांमध्ये दोन प्रकारची (एक्स आणि वाय) क्रोमोझोम असतात. तर पुरुषांमध्ये एक एक्स आणि दुसरं लहान क्रोमोझोम वाय असतं. एक्समध्ये ९०० जीन्स असतात. त्यांच्या कामाचा लिंग धारणेशी काहीही संबंध नसतो. यामुळे मुलगा की मुलगी ते ठरत नाही. वाय क्रोमोझॉममध्ये जवळपास ५५ जीन असतात. याशिवाय अनेक नॉन-कोडिंग डीएनए असतात. वाय क्रोमोझोम आकारानं एक्सपेक्षा लहान असतो. त्यात जीन कमी असतात. मात्र भ्रूण विकसित होऊन त्यापासून मुलगा होणार की मुलगी ते त्यापासून निश्चित होतं.

१६.६ कोटी वर्षांनी वाय क्रोमोझोम ९०० जीनवरून कमी होत ५५ जीन्सवर आलं आहे. याचा अर्थ दर १० लाख वर्षांनी माणसांमधील वाय क्रोमोझोम ५ जीन संपत आहेत. म्हणजेच पुढील १.१० कोटी वर्षांत माणसांमधील वाय क्रोमोझोम पूर्णत: आपले सगळे जीन गमावेल. त्यामुळे पुरुष जन्मालाच येणार नाहीत. पृथ्वीवर पुरुष वाचल्यास त्यांच्यासाठी एखादा नवा जीन तयार होणार का, हा प्रश्न आहे.
बायको घरमालकासोबत ल्युडो खेळू लागली; स्वत:ला पणाला लावून हरली, पतीला कॉल केला अन् मग…
उंदरांच्या काही प्रजातींमधील वाय क्रोमोझोन संपले आहेत. मात्र तरीही त्यांचं अस्तित्व कायम आहे. पूर्व युरोपमधील मोल वोल्स आणि जपानमधील स्पायनी रॅट्स यांच्या शरीरातील वाय आणि एसआरवाय क्रोमोझोम्स संपुष्टात आली आहेत. मात्र दोन्ही लिंगांमध्ये म्हणजेच मादी आणि नरांमध्ये एक्सएक्स क्रोमोझोम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. याबद्दल संशोधन सुरू आहे. मोल वोल्स आणि स्पायनी रॅट्समध्ये एसआरवाय जीन नाहीए.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here