किरकोळ महागाई ७.१ टक्के
वस्तूंच्या चढ्या किमती आणि चलनविषयक धोरण लक्षात घेऊन जीडीपी (GDP) चा हा अंदाज लावण्यात आला आहे. जागतिक बँकेने म्हटले की, भारताची अर्थव्यवस्था जागतिक धक्क्यांना चांगल्या प्रकारे हाताळत आहे. या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१ टक्के असू शकते. लक्षणीय म्हणजे, हे रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) समाधानकारक श्रेणीपेक्षा खूप वर आहे.
आरबीआयचा अंदाज
या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के वेगाने वाढेल, असा अंदाज देशाची केंद्रीय बँक, आरबीआयने व्यक्त केला आहे. यापूर्वी आरबीआयचा अंदाज ७.२ टक्के होता, ज्यात बँकेने कपात केली आहे. विशेष म्हणजे जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर ६.३ टक्के होता तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ८.४ टक्के होता. महत्त्वाचे म्हणजे, आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने सप्टेंबर तिमाहीत ६.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताचा विकास दर १३.५ टक्के होता.
जीडीपी म्हणजे काय?
जीडीपी हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वात सामान्य निर्देशकांपैकी एक आहे. जीडीपी विशिष्ट कालावधीत देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य दर्शवते. यामध्ये देशाच्या हद्दीत राहून उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. जीडीपीचे दोन प्रकार आहेत. वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी. वास्तविक जीडीपीमध्ये वस्तू आणि सेवांचे मूल्य आधार वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किंमतीवर मोजले जाते. सध्या जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष २०११-१२ आहे. म्हणजे २०११-१२ मधील वस्तू आणि सेवांच्या दरांनुसार गणना केली गेली. तर नाममात्र जीडीपी वर्तमान किमतीवर मोजला जातो.