नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमधून महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर जून महिन्यात आफताबनं जगातील सर्वात महागडा खटला अनेकदा पाहिला. त्यानं या खटल्याशी संबंधित गोष्टी बऱ्याचदा वाचल्या. आफताबनं या खटल्याशी संबंधित डावपेच समजून घेतले.

श्रद्धाशी संपर्क होत नसल्यानं तिच्या मित्रांना काळजी वाटली. श्रद्धा स्वत:च्या कुटुंबियांच्या संपर्कात नसल्यानं मित्रांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांनी आफताबवर संशय व्यक्त केला. यानंतर मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीला बोलावलं. त्यानं पोलिसांची दिशाभूल केली. श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सोडून दिलं.
पोलीस अधिकारी वाहनं तपासायचा, कागदपत्रं मागायचा; चालक कावले, धागेदारे सूतगिरणीपर्यंत गेले
दिल्ली पोलिसांनी आफताबची चौकशी केली. मुंबई पोलिसांप्रमाणेच त्यानं दिल्ली पोलिसांचीही दिशाभूल केली. आफताबच्या सर्च हिस्ट्रीवरून आता याबद्दलची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी पकडल्यास कायदेशीर हातखंडे काय असतात याबद्दलची माहिती आफताबनं आधीच पाहिली होती. याच माहितीचा वापर करून त्यानं दिल्ली, मुंबई पोलिसांची दिशाभूल केली. आपण कधीतरी पकडले जाणार याची कल्पना आफताबला होती. त्यामुळे त्यानं पूर्वतयारी केली होती.
बायको घरमालकासोबत ल्युडो खेळू लागली; स्वत:ला पणाला लावून हरली, पतीला कॉल केला अन् मग…
जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरण काय?
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची माजी पत्नी एम्बर हर्डनं २०१८ मध्ये एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. मी घरगुती हिंसाचाराची पीडित असल्याचं तिनं सांगितलं. जॉनीनं शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं हर्डनं म्हटलं होतं. यानंतर जॉनी डेपनं तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा खटला संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला. जवळपास १०० तास साक्षी नोंदवण्यात आल्या. जॉनीच्या बाजूनं न्यायालयात तगडा युक्तिवाद झाला. संपूर्ण जगात हा खटला लाईव्ह पाहिला गेला. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबनं दिल्लीतील फ्लॅटमधून या खटल्याचं थेट प्रक्षेपण पाहिलं. जॉनीनं हा खटला जिंकला. त्याला भरपाई म्हणून १५ मिलियन डॉलर मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here