अकोला : अनेकदा घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहेत. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, अथवा रेल्वेतून घाईत खाली उतरण्याच्या प्रयत्नात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरवर्षी कितीतरी लोक मरण पावतात तर अनेक गंभीर जखमी होतात. दरम्यान, काल अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर शालीमार एक्सप्रेसमधून एक ४ वर्षीय बालक प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुद्धबाजूने खाली उतरला. रेल्वे स्थानकावरून रवाना होण्यासाठी तयार होती, त्यात अचानक हा बालक ट्रेनच्या खालून प्लॅटफॉर्मच्या बाजूकडे येवू लागला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लागलीच त्याला रेल्वेखालून वरती ओढले. अशाप्रकारे या बालकाचा जीव वाचवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे बालकाचा जीव वाचला

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अकोला स्थानकावर ड्युटीवर असताना या रेल्वे पोलिसातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव व पोलीस शिपाई गोपाल सोळंगने यांनी प्रवासी बालक रेल्वे खालून प्लॅटफॉर्मवर येत असताना, त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळेत या बालकाला रेल्वेच्या खालून वर ओढले. या समसूचकतेमुळे बालकाचा जीव वाचला. जाधव आणि सोळंगने यांच्या या धाडसी कृत्याचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

Himachan Pradesh Exit Poll: हिमाचलमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’; भाजप सत्ता राखणार का?
काय आहे संपूर्ण प्रकार?

काल, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता रेल्वे क्रमांक १८०३० शालीमार एक्सप्रेस ही अकोला रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म क्र. १ वर येवून थांबली. या ट्रेनमधून प्रवास करणारी एक अपंग व्यक्ती ही स्थानकावर गर्दी असल्याने आपली पत्नी व ४ वर्षांच्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुध्द बाजूने खाली रेल्वे ट्रॅकवर उतरली होती. ही ट्रेन पुढील स्थानकाकडे निघण्यासाठी तयार असताना त्यांचा लहान ४ वर्षांचा मुलगा अचानक रेल्वेच्या खालून प्लॅटफॉर्मच्या बाजूकडे येवू लागला.

बैलगाडा शर्यत आली अंगलट! प्रेक्षकांची आरडाओरड, बैल गोंधळले, रनवे सोडून थेट शेतात ठोकली धूम
हे पाहताच इतर प्रवाशांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेल्या पोलीस दिलीप जाधव व गोपाल सोळंगने यांनी प्रसंगावधान दाखवून, या लहान बालकाला प्लॅटफॉर्मवर ओढून घेतले आणि त्याचा जिव वाचवला.

त्यानंतर अवघ्या १० सेकंदात रेल्वे पुढील स्थानकासाठी रवाना झाली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना अवाहन करण्यात येत आहे की, कोणीही अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेमध्ये चढणे-उतरणे किंवा रेल्वे लाईन क्रॉस करणे अशा प्रकारची धोकादायक कृत्ये करू नयेत.

लोहगडावर फिरणे पडले महागात!, पेण येथील विद्यार्थ्यांची बस ४० फूट खोल दरीत कोसळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here