हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार या प्रवाशाचं नाव विजय कुमार शुक्ला आहे. माझ्याकडे ७४ आणि ७५ क्रमाकांच्या आसनांची तिकिटं होती. मात्र डब्यात त्या क्रमांकांची आसनंच नव्हती. ही बाब मी टीटीईच्या कानावर घातली, असं शुक्ला यांनी सांगितलं. असे प्रकार आमच्यासाठी सामान्य असल्याचं टीटीई म्हणाला. त्यानंतर शुक्ला यांनी संबंधित विभागाकडे आणि बड्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. मात्र तांत्रिक घोळ सोडवण्यासाठी अद्याप तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
सी-१ कोचमध्ये ७४ आणि ७५ क्रमांकांची आसनं नव्हती. मात्र रेल्वेनं शुक्ला यांना निराश केलं नाही. शुक्ला आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या भावाला रेल्वेनं आसनं उपलब्ध करून दिली. ‘दुसऱ्या डब्यात ७५ आसनं होती. मात्र विजय शुक्लांना जो डबा मिळाला, त्यात ७३ आसनंच होती. पण आयआरसीटीसीचा सर्व्हर ७५ आसनंच दाखवतो. त्यामुळे अनेकदा गडबड होते,’ असं टीटीईनं शुक्ला यांना सांगितलं. असे प्रकार जवळपास रोज घडतात. त्यामुळे प्रवासी चिडतात, शिवीगाळ करतात, अशी व्यथा टीटीईनं मांडली.
indian railway, IRCTCवरून २ तिकिट बुक, पण ट्रेनमध्ये ‘त्या’ सीटच नाहीत; प्रवासी हैराण, रेल्वेचा भन्नाट जुगाड – railway passenger books tickets for seats that dont exist
लखनऊ: रेल्वेमध्ये कन्फर्म तिकीट मिळवणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच असतं. बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-तिकिट दिसल्यावर जीव भांड्यात पडतो. रेल्वेचं कन्फर्म तिकिट म्हणजं जणू काही लॉटरीच. मात्र तुम्हाला अस्तित्वातच नसलेल्या आसनांची तिकिटं मिळाली तर? एका रेल्वे प्रवाशासोबत असा प्रकार घडला आहे.