इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमधील रुग्णालयात एका कुटुंबानं पुजा सुरू केली. महाराजा यशवंतराव रुग्णालयात सुरू असलेली पूजा पाहून डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. अगरबत्ती, बास्केट आणि दगड घेऊन चार जणांच्या कुटुंबानं शवागाराच्या जवळच पूजा सुरू केली. या कुटुंबात दोन पुरुष, एक महिला आणि लहान मुलीचा समावेश होता. तासाहून अधिक वेळ त्यांनी पूजा केली.

कुटुंबाकडून सुरू असलेल्या पुजेबद्दल रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. त्यावर आम्ही आमच्या मुलाचा आत्मा घेऊन जाण्यास आलो आहोत. दोन वर्षांपूर्वी आमच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचं कुटुंबानं सांगितलं. रतलाम जिल्ह्यातील १८ वर्षीय मोहन पाटीलचा एम वाय रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला. त्यांनी ऑटोप्सी केली. त्यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेतला आणि गावात जाऊन अंत्यसंस्कार केले, अशी माहिती कुटुंबानं दिली.

मृत्यूनंतर काही दिवसांनी मोहन त्याच्या आईच्या आणि वहिनीच्या स्वप्नात येऊ लागला. माझा आत्मा एम. वाय. रुग्णालयाच्या शवागारात अडकला असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे आम्ही त्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. आम्ही काही मंत्रोच्चार करू. त्यामुळे त्याचा मृत्यू शिळेत (कुटुंबानं आणलेल्या दगडात) येईल. तो घेऊन आम्ही गावाला जाऊ, असं कुटुंबातील सदस्यानं सांगितलं.

कुटुंबाचं बोलणं ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. पूजा पूर्ण झाल्यानंतर आत्म्याला मुक्ती मिळेल. तो रुग्णालयाच्या शवागारातून सुटेल, असं कुटुंबानं म्हटलं. हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा असल्याचं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटलं. पण कुटुंबाचा विश्वास असल्यानं डॉक्टरांनी त्यांना रोखलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here