अमरावती: वॉशिंग मशीनवरून झालेला वाद टोकाला गेला. दोन शेजाऱ्यांनी महिलेवर दगडांनी हल्ला केला. यात महिलेचा जीव गेला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. श्री सत्य साई जिल्ह्यातील कादिरी शहरात हा प्रकार घडला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पद्मावती बाई असं मृत महिलेचं नाव आहे. पद्मावती बाई कादिरी शहरातील मशानामपेटा परिसरात वास्तव्यास होत्या. सकाळच्या सुमारास त्यांचा शेजारी राहणाऱ्या वेमन्ना नाईक आणि प्रकाश नाईक यांच्याशी वॉशिंग मशीनवरून वाद झाला. भांडण टोकाला गेल्यावर दोघांनी महिलेवर दगडांनी हल्ला केला. त्यामुळे महिला बेशुद्ध पडली.
मोहनचा आत्मा इकडे भटकतोय, आम्ही त्याला न्यायला आलोय! कुटुंबाची शवागाराजवळ पूजा अन् मग…
पद्मावती बाईंना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती नाजूक असल्यानं डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी बंगळुरुतील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबियांनी पद्मावती बाईंना बंगळुरुला नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वेमन्ना नाईक आणि प्रकाश नाईक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कोठडीत केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here