ट्रकमधील डिझेल कमी होणं आणि लॉटरी लागण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्याल. मात्र ८ कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेनं याचा संबंध जोडला आहे. ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानंच आपल्याला लॉटरी लागल्याचं महिलेनं सांगितलं.

पंपावर डिझेल भरत असताना लॉरा यांनी तिथे लॉटरीचं तिकीट काढलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांत लॉरा यांना लॉटरी लागली. लॉरा यांनी ८ कोटीपेक्षा अधिक रक्कम जिंकली. लॉटरी लागल्याचं समजताच लॉरा यांना प्रचंड आनंद झाला. आपल्याला लॉटरी लागली आहे, यावर त्यांना बराच वेळ विश्वासच बसला नाही.
ज्या परिस्थितीत लॉटरी लागली त्याबद्दल लॉरा यांना सर्वाधिक आश्चर्य वाटलं. त्या दिवशी ट्रकमधील इंधन संपल्याचा सिग्नल पेटलाच नसता तर मी लॉटरीचं तिकिट खरेदीच केलं नसतं. त्यामुळे जुळून आलेल्या योगायोगानं चकित झाल्याचं लॉरा यांनी सांगितलं.
नॉर्थ कॅरोलिनामध्ये वास्तव्यास असलेल्या मार्सिया फिने यांनीदेखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे लॉटरी जिंकली होती. मार्सिया एका दुकानात चिप्स खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांनी दुकानातून २ हजार रुपयांचं लॉटरीचं तिकिट खरेदी केलं. त्यामुळे त्यांना ५७ लाख रुपयांची लॉटरी लागली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.