नवी दिल्ली: श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या करणारा आफताब पुनावाला सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात दररोज नवी माहिती उघडकीस येत आहे. आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मृतदेहामधून दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यानं ३०० लीटरचा फ्रिज खरेदी केला. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि एक-एक तुकडा घेऊन तो रात्री बाहेर पडायचा. अशा प्रकारे त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावली.

श्रद्धाला संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुठे टाकायचे असा प्रश्न आफताबला पडला होता. अखेर एका मित्राच्या फ्लॅटवर त्याला कल्पना सुचली. आफताबच्या मित्राचं घर महरौली वन परिसराजवळ आहे. याच जंगलात मृतदेहाचे तुकडे फेकल्यास कोणालाच संशय येणार नाही असा विचार त्यानं केला. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे ४ महिने फ्रिजमध्ये होते, अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
सगळ्यात महागडा खटला LIVE पाहिला; ‘ती’ केस बघून आफताबचा दिल्ली, मुंबई पोलिसांना गुंगारा
१८ मे रोजी आफताबनं श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर त्यानं जवळच असलेल्या बाजारातून करवत आणि फ्रिज आणला. जवळपास १० तास बसून त्यानं मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. या तुकड्यांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यानंतर त्यानं तुकडे जंगलात फेकायचं ठरवलं. ही कल्पना त्याला मित्राच्या फ्लॅटवर सुचली. आफताब आपल्या घरी आला होता, अशी माहिती त्याचा मित्र बद्रीनं दिली. बद्रीचं वास्तव्य असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आफताब फिरत होता. त्यावेळी त्यानं जंगल पाहिलं. बद्रीचा फ्लॅट महरौली जंगलाच्या जवळ आहे.
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार?
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन आफताबनं ४ महिने ते फ्रिजमध्ये ठेवले. रात्री २ वाजता तो दररोज घराबाहेर पडायचा आणि मृतदेहाचे तुकडे शहराच्या विविध भागांत फेकले. बरेचसे तुकडे त्यानं जंगलात टाकले. १२ नोव्हेंबरला आफताबला अटक करण्यात आली. श्रद्धाशी संपर्क होत नसल्याची माहिती तिच्या एका मित्रानं तिच्या वडिलांना दिली. यानंतर श्रद्धाचे वडील पोलिसात गेले. मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. आफताबवर संशय व्यक्त केला. यानंतर आफताबची चौकशी झाली. सुरुवातीला त्यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला अटक झाली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here