जयपूर: राजस्थानच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील माहिती सहाय्यकाचे प्रारंभिक मासिक वेतन १२,००० रुपये आहे. विभागात कायमस्वरूपी झाल्यावर दरमहा ३२ हजार रुपये इतका पगार मिळणे सुरू होते. यावरून आपण विचार करू शकतो की, एखाद्या माहिती सहाय्यक कर्मचाऱ्याकडे किती मालमत्ता असू शकते. ही मालमत्ता एकतर ५ लाख, १० लाख किंवा २० लाख…..पगारानुसारच आपण हा अंदाज लावू शकतो. पण जेव्हा भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या (एसीबी) पथकाला राजस्थानच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मालमत्तेची माहिती मिळाली तेव्हा पथकाचे अधिकारीही अवाक् झाले. बेहिशोबी मालमत्तेची माहिती मिळताच एसीबीच्या पथकाने प्रतिभा कमल यांच्या जागेवर छापा टाकून झडती घेतली. झडतीदरम्यान सापडलेली मालमत्ता पाहून एसीबीचे अधिकारीही चकित झाले. या छाप्यात पथकाला एकूण साडे सहा कोटींची संपत्ती आढळली.

२२ लाख ९० हजारांची रोकड आणि १.५ किलो सोन्याचे दागिने सापडले

एसीबीचे डीजी भगवान लाल सोनी यांनी या छाप्याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रतिभा कमल यांच्या दोन ठिकाणांवर बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आल्याने छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान त्याच्या जयपूर येथील राहत्या घरातून २२ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, चार आलिशान कार, एक बीएमडब्ल्यू कार, एक बीएमडब्ल्यू मोटारसायकल यासह मोठ्या प्रमाणात चल-अचल मालमत्तेची माहिती मिळाली आहे.

सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल
इतकेच नाही, तर प्रतिभा कमल आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे ११ बँक खाती असल्याची माहिती मिळाली असून, त्याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. १२ विमा पॉलिसींची कागदपत्रे सापडली आहेत. यासोबतच ७ दुकाने आणि १३ निवासी आणि व्यावसायिक भूखंडांची कागदपत्रेही सापडली आहेत. एडीजी दिनेश एमएन यांच्या निर्देशानुसार एसीबीचे अतिरिक्त एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड आणि त्यांची टीम ही संपूर्ण कारवाई करत आहे.

४ वर्षांचा मुलगा ट्रेनखालून फलाटावर येत होता, पाहणाऱ्यांच्या अंगाचा उडाला थरकाप, इतक्यात…
एवढी मोठी रक्कम मिळाल्याने कर्मचाऱ्यांना धक्काच बसला

मंगळवारी सकाळी एसीबीच्या पथकाने माहिती सहाय्यक प्रतिभा कमल यांच्या घरावर आणि कार्यालयावर अचानक छापा टाकला. दुपारपर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सापडलेल्या मालमत्तेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. प्रतिभा कमल यांच्या मालमत्तेची बातमी सोशल मीडियावर येताच सर्व कर्मचारी चक्रावले.

प्रतिभा कमल यांच्या संपत्तीची माहिती असल्याने मंगळवारी डीओआयटी कार्यालयात दिवसभर याचीच चर्चा सुरू होती. एबीसीची टीम आता बँक खात्यांची चौकशी करणार आहे. खात्यांमध्ये आणखी पैसे असण्याची शक्यता आहे.

बेळगावात महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, पवारांचा कर्नाटकला अल्टिमेटम…; वाचा, टॉप १० न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here