काल रात्रीपासून राज्यपाल टंडन यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती नखनऊमधील मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. टंडन यांची तब्येत खालावली असल्याचे ते म्हणाले होते. आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
लालजी टंडन हे लखनऊचे खासदारही होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील टंडन यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते सतत टंडन यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले. मोदी म्हणाले, ‘श्रद्धेय लालजी टंडन यांना विनम्र श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. टंडन यांनी समाजसेवेसाठी अमूल्य योगदान दिले. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मजबूत बनवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते एक कुशल प्रशासक आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर होते.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times