नवी दिल्ली: वाढलेल्या इंधन दरांनी सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींचा परिणाम ग्राहकांच्या खिशावरील भार दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईने हैराण असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता इंधनाच्या किमतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सलग ६ महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या काळात सरकार आता दर १५ दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि एव्हिएशन फ्युएल (एटीएफ) वर लावण्यात आलेल्या नवीन कराचा आढावा घेणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. म्हणजेच सरकारकडून आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन इंधन करावरील दराचा १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था सुसाट धावणार; GDP बाबत जागतिक बँकेने दिली आनंदाची बातमी
अर्थमंत्र्यांनी माहिती दिली
“ही कठीण वेळ आहे आणि जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत,” इंधनाच्या किमतींबाबत अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. यावेळी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उताराचे वातावरण आहे मात्र, सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही निर्यातीला परावृत्त करू इच्छित नाही तर देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध नसेल आणि निर्यात होत राहिली, तर त्याचा काही भाग आपल्या नागरिकांसाठी ठेवण्याची गरज आहे.”

परदेशातून भारतासाठी आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांत सर्वसामान्यांना दिलासा?
कच्च्या तेलाची किंमत
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि या वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचली. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर मार्चमध्ये तेलाच्या किमती १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या, जो २००८ नंतरचा त्यांचा सर्वोच्च स्तर आहे. मात्र, अलीकडे त्याच्या किंमतींत घट नोंदवण्यात अली आहे. मंगळवारी, ब्रेंट क्रूड ३.३३ डॉलर किंवा चार टक्क्यांनी घसरून ७९.३५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. त्याच वेळी, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड देखील २.६८ डॉलर किंवा ३.५ टक्क्यांनी घसरून ७४.३५ वर आला, जो यंदाची नीचांकी पातळी आहे.

अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा; कररचनेत बदल होणार? काय आहेत संकेत
पेट्रोल-डिझेलचे दर
देशभरात वाहनचालकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आणि इंधन दरांत आज देखील कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलण्याची व्यवस्था आहे. यामध्ये बदल झाल्यास सकाळी ६ वाजता किमती आपोआप अपडेट होतात. दरम्यान, यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या निर्यातीवर कर लागू करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली होती. याअंतर्गत पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रतिलिटर ६ रुपये तर डिझेलच्या निर्यातीवर १३ रुपये प्रतिलिटर कर लागू करण्यात आला. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here