यापूर्वी आरबीआयने व्याजदरात चार वेळा वाढ केली आहे. या वर्षी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात मेमध्ये ०.४० टक्के, जून आणि ऑगस्टमध्ये ०.५० टक्के आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा ०.५० टक्के वाढ केली होती. या निर्णयामुळे आता गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.
यावर्षी २.२५% वाढ
यंदा वर्ष अखेरीस रेपो दरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर मध्यवर्ती बँकेचा मुख्य व्याजदर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच लक्षात घ्या की या वर्षी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात एकूण २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील महागाई दर निश्चित केलेल्या ६ टक्क्यांच्या खाली आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने FY23 साठी सीपीआय महागाईचा अंदाज ६.७% वर कायम ठेवला आहे. तर पुढील १२ महिन्यांत महागाईचा दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
काय-काय महागणार
आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्याने एकीकडे तुमच्या कर्जाचे ईएमआय वाढतील, तर दुसरीकडे घर किंवा कार घेणे महाग होईल. रेपो रेट, या दरावर आरबीआय बँकांना कर्ज देते. त्यामुळे रेपो दरात वाढ झाल्यास कर्जाचा व्याजदरही वाढतो. याउलट रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होते. त्यामुळे आता रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर कसा पडणार आहे.
रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचं गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोनचा ईएमआय वाढणार आहे. याशिवाय वाहन कर्ज आणि इतर सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीने यापूर्वी बँकेकडून ५.९०% दराने कर्ज घेतले असेल, तर त्याला आता नवीन व्याजदराने अधिक ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत आता त्याला त्याच्या कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.