जळगाव : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल पोलिसांच्या पथकाला पाहून कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर सुसाट पळवणाऱ्या चालकाने सात ते आठ जणांना धडक दिली. ही गंभीर घटना मंगळवारी दुपारी जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ घडली. या अपघातात पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला असून पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर चालक कारवाईच्या भीतीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवतात. मंगळवारी दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडला. नदीपात्रातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर जळगावकडे येत होता. याचवेळी चालकाला पोलिसांचे पथक ट्रॅक्टरचा पाठलाग करत असल्याचे समजले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना फडणवीस, अजित पवार आज आमने-सामने

कारवाईच्या भीतीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवत होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ ट्रॅक्टर चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तसंच एका कारवर जाऊन ट्रॅक्टर आदळला.

दरम्यान, या अपघातात जावेद शेख अजीज (वय-२८, रा. पाळधी), ज्ञानेश्वर ठोसरे (वय-२३ रा. खोटेनगर), रामकृष्ण मराठे (वय-५०, रा. खोटेनगर) हे आणि आणखी दोन जण जखमी झाले आहेत . त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here