नवी मुंबईच्या कोपरखैरणेत वास्तव्यास असलेल्या विवाहितेनं तिच्या ५ वर्षीय मुलासह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे. महिलेचा सासरच्यांकडून छळ सुरू असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

 

woman suicide
नवी मुंबई: सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या पाच वर्षीय मुलासह सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कोपरखैरणेमध्ये उघडकीस आली आहे. घटनेत विवाहितेचा मुलगा अर्विक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह सासू व नणंदेच्या विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. विवाहितेचे नाव आरती विजेंद्र मल्होत्रा असे असून जानेवारी २०१६ मध्ये तिचा विवाह ऑनलाईन मॅट्रिमॉनियल साईटवरुन कोपरखैरणे येथे राहणाऱ्या विजेंद्र मल्होत्रासोबत झाला होता. त्यानंतर आरती पती, सासू-सासरे व नणंद या सर्वांसह कोपरखैरणे सेक्टर २० मधील श्री रावेची अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहत होती.
ल्युडोमध्ये स्वत:ला पणाला लावून महिला हरली; प्रकरणात आता नवा ट्विस्ट; पोलीस म्हणतात…
लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरकडील मंडळीनी तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. सोमवारी सासू आणि नणंद यांनी आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार आरतीच्या भावाने कोपरखेरणे पोलीस ठाण्यात केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here