kamalkant shah poisoning case: मुंबईतील व्यावसायिक कमलकांत शाह यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती उघड होत आहे. शाह यांच्यावर त्यांचीच पत्नी कवितानं प्रियकराच्या मदतीनं विषप्रयोग केला. शाह यांच्या शरीरात थॅलियम आणि आर्सेनिकचं प्रमाण गरजेपेक्षा ३५० पट अधिक होतं.

 

shah
मुंबई: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवल्याची घटना गेल्या आठवड्यात मुंबईत उघडकीस आली. गारमेंट व्यावसायिक असलेल्या कमलकांत शाह यांना त्यांच्याच पत्नीनं जेवणातून आर्सेनिक आणि थॅलियमचं मिश्रण दिलं. अंगात हळूहळू विष भिनत गेल्यानं व्यावसायिकाचा मृत्यू झाला. कमलकांत यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू होता. त्यांनी अनेक चाचण्या केल्या. मात्र त्यातून काहीच हाती लागलं नाही. एके दिवशी डॉक्टरांचं लक्ष कमलकांत यांच्या केसांकडे गेलं आणि ही संपूर्ण केस उघडकीस आली.

कमलकांत शाह यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे असलेल्या डॉक्टरांचं लक्ष शाह यांच्या दाढी आणि मिशीकडे गेलं. शाह यांचे केस वाढत नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. यानंतर डॉक्टरांनी रक्त चाचणी करण्यास सांगितलं. त्यातून धक्कादायक बाब समोर आली. शाह यांच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण प्रचंड होतं. शाह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
…तरच तिला मिळणार होती पूर्ण प्रॉपर्टी; पतीवर विषप्रयोग करणाऱ्या पत्नीबद्दल नवी माहिती उघड
शाह यांनी डझनभर चाचण्या केल्या होत्या. मात्र त्यातून काहीच समोर आलं नाही. यानंतर डॉ. संजय वागळेंनी शाह यांना रक्त चाचणी करण्याची सूचना केली. ‘आम्ही त्यांच्यावर अनेक पद्धतींनी उपचार करून पाहिले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या पोटदुखीचं कारण समजत नव्हतं. त्याचवेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. शाह रुग्णालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांनी क्लिन शेव्ह केली होती. महिनाभरानंतरही त्यांचे केस वाढले नव्हते,’ असं वागळेंनी सांगितलं.
होय, माझ्या पतीला मीच विष देऊन मारलं, पण…; पत्नीकडून कबुली; पोलिसांनी जुनी ट्रिक वापरली
शाह यांच्या रक्तातील आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण ३५० पट अधिक होतं. याची माहिती वागळेंनी आझाद मैदान पोलिसांना दिली. शाह यांची प्रकृती उत्तम होती. त्यामुळे त्यांना विष देण्यात आल्याचा संशय वागळेंनी व्यक्त केला. ‘मेटल ब्लड टेस्टचे रिपोर्ट येण्यास ५-६ दिवस लागले. त्यामुळे उपचारांना विलंब लागला. याच परिस्थितीमुळे रुग्णाचा जीव गेल्याचं आम्ही पोलिसांना सांगितलं. आमच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारची केस पाहिली. आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या शरीरात जड धातूंचं प्रमाण अधिक असतं. मात्र कमलकांत यांनी आयुर्वेदिक उपचार घेतले नव्हते,’ असं वागळे म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here