श्रद्धा आणि आफताब छतरपूरमध्ये राहायला जाण्यापूर्वी हिमाचल प्रदेशला गेले होते. तिथे त्यांची ओळख बद्रीशी झाली. बद्रीच्या घरात श्रद्धा आणि आफताबचं भांडण झालं होतं. त्यावेळी बद्रीला मध्यस्थी करायला लागली होती. दिल्ली पोलिसातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्री हा श्रद्धा आणि आफताबचा मित्र होता. मात्र आफताबला श्रद्धा आणि बद्रीची मैत्री आवडत नव्हती.
‘श्रद्धा आणि बद्री चांगले मित्र झाले. बद्रीच्याच सल्ल्यावरून दोघे मेच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला आले. सुरुवातीला दोघे गेस्ट हाऊसमध्ये राहिले. मग हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. यानंतर त्यांनी बद्रीच्या मदतीनं १४ मे रोजी छतरपूरमध्ये फ्लॅट भाड्यानं घेतला. याच फ्लॅटमध्ये १८ मे रोजी आफताबनं श्रद्धाची हत्या केली,’ अशी माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली.
बद्रीच्या घरात आफताब आणि श्रद्धाचा वाद झाला होता. बद्रीसमोरच दोघे भांडले. त्यांचा वाद बद्रीनंच सोडवला. त्यामुळे बद्री या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. पोलिसांनी कलम १६४ च्या अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे. बद्रीचं घर महरौलीतील जंगल परिसराजवळ आहे. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. ४ महिन्यांनंतरही त्याला तुकडे कुठे टाकायचे ते समजत नव्हती. बद्रीच्या घरी गेला असताना आफताब गच्चीत फिरत होता. त्यावेळी त्यानं जंगल पाहिलं आणि याच भागात तुकडे फेकण्याचा निर्णय घेतला.