नेमकी आकडेवारी पाहिल्यास भाजपला दिल्ली विधानसभेच्या तुलनेत पालिकेत ०.७२ टक्के अधिकम मतदान झालं आहे. मात्र आपला मिळालेल्या मतांमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. आपला मिळालेली मतं ११.२२ टक्क्यांनी घटली आहेत. काँग्रेसनं विधानसभेच्या तुलनेत पालिका निवडणुकीत जास्त मतं घेतली. विधानसभा निवडणुकीत केवळ ४.२६ टक्के मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. मात्र पालिका निवडणुकीत हाच आकडा १२.१६ टक्क्यांवर पोहोचला. म्हणजेच काँग्रेसला झालेलं मतदान ७.९ टक्के जास्त आहे.
महापालिका निवडणुकीत आपच्या जागा वाढल्या, त्यांची सत्तादेखील आली. मात्र मतदारांची संख्या कमी झाली आहे. मुस्लिमबहुल परिसरात, झोपडपट्ट्यांचं प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये आपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही मुस्लिम आणि गरिब मतदार आपपासून दुरावले आहेत. आपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
delhi mcd election results, दिल्ली पालिकेत आपची सत्ता, पण ११ टक्क्यांनी वाढवली केजरींची चिंता; चक्रावून टाकणारी आकडेवारी – app got 11 percent less votes in mcd election in comparison to 2020 delhi assembly election
नवी दिल्ली: दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षानं बाजी मारली. त्यामुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची १५ वर्षांपासूनची सत्ता खालसा झाली आहे. राज्यापाठोपाठ महापालिकेत सत्ता आणण्याची किमया आपनं करून दाखवली. मात्र मुख्यमंत्री आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासमोर वेगळंच टेन्शन आहे. आपला निवडणुकीत ४२ टक्क्यांच्या आसपास मतं मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के मिळाली होती. त्यामुळे ११ टक्के मतं कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.