delhi mcd election results: दिल्ली महापालिकेतील भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात आपला यश आलं आहे. भाजपला २५० पैकी १०४ जागा मिळाल्या. तर आपनं १३४ जागांवर यश मिळवलं. काँग्रेसला अवघ्या ९ जागांवर यश मिळालं. मात्र तीन जागांवर हे तिन्ही मोठे पक्ष अपयशी ठरले आहेत.

इशान्य दिल्लीतील सीलमपूर मतदारासंघात मुस्लिमांचं प्राबल्य आहे. इथे एकूण ७ उमेदवार मैदानात होते. वॉर्ड महिलांसाठी राखीव होता. शकिला बेगम याआधी इथे बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. मात्र यंदा त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या. शकिला याआधी दोनदा नगरसेविका राहिल्या आहेत. त्यांचे पती आधी बसप आणि आपमध्ये होते.
दिल्ली महापालिकेतील १२६ क्रमांकाचा (ईसापूर) वॉर्डदेखील महिलांसाठी राखीव होता. ईसापूरमधून मीना देवी विजयी झाल्या. या ठिकाणी एकूण ८ जण रिंगणात होते. वॉर्ड क्रमांक ३५ (मुंडका) मधून अपक्ष उमेदवार गजेंद्र सिंह दराल विजयी झाले. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होता. हा वॉर्ड मुंडका विधानसभा मतदारसंघात येतो.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.