नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून गेल्या काही दिवस महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे. या वादाचे पडसाद आज संसदेतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी हा मु्द्दा लोकसभेत उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यांमुळे भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याची टीका खासदार सावंत यांनी केली, तर हा सीमावाद म्हणजे महाराष्ट्राविरोधी षडयंत्र असून या प्रश्नावर गृहमंत्री अमित शहा यांनी बोलले पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले. मात्र त्यावर हा दोन राज्यांचा प्रश्न असून त्यावर केंद्र सरकार काय करणार.. ही संसद आहे, अशी भूमिका लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी मांडली. सभापती बिर्ला यांनी केलेल्या विधानावर मविआच्या खासदारांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटक राज्याचे मु्ख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला मुद्दा आहे. मात्र, या वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आक्षेपार्ह विधाने करत आहेत. महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली जात आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

विखे पाटील-थोरात संघर्ष; हे उघड्या डोळ्यांनी पाहायचे का?, विखेंचे थोरातांना उत्तर
गृहमंत्री अमित शहा यांनी यावर बोलले पाहिजे- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आज लोकसभेत आक्रमकपणे उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे या मुद्द्यावर काहीही बोलत आहेत. काल तर त्यांनी हद्दच केली. महाराष्ट्राचे जे लोक सीमावर जात होते त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे आणि महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई करत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे राज्य आहे. बोम्मई हे महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत. हे चालणार नाही. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी बोलले पाहिजे.

सीमवादाचे सोलापुरात तीव्र पडसाद; कर्नाटकच्या बस अडवून फासले काळे, वाहक-चालकांचा असा केला सत्कार
काय म्हणाले सभापती ओम बिर्ला?

सीमावादावर महाराष्ट्राती मविआच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मुद्द्यावरून काही काळ लोकसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यात हस्तक्षेप करत सभापती बिर्ला म्हणाले की, ‘तुमच्या कोणत्याही वक्तव्याची नोंद घेतली जात नाही. काहीही रेकॉर्ड केले जात नाही. तु्म्ही काहीही बोलता, काही रेकॉर्डमध्ये जात नाही आहे. हा संवेदनशील विषय आहे. हा विषय दोन राज्यांचा आहे, त्यात केंद्र सरकार काय करणार , ही संसद आहे.

सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here