पुण्यातील मनसे नेते बाबू वागसकर यांच्यामुळे वसंत तात्या मोरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. वसंत मोरे यांनी थेट बाबू वागसकरांचं नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे निलेश माझिरे यांनीही बाबू वागसकर यांच्यामुळे पुणे मनसेत वादावादी होत असल्याचं सांगत त्यांना कार्यकारिणीतून हटवलं जावं, अशी मागणी केलीये. तात्यांना नडणारे मनसे नेते बाबू वागसकर कोण आहेत? वसंत मोरे आणि वागसकरांचा नेमका वाद काय आहे? वाचा…

हायलाइट्स:
- तात्यांना नडणारे मनसे नेते बाबू वागसकर कोण आहेत?
- वसंत मोरे आणि वागसकरांचा नेमका वाद काय आहे? वाचा…
नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यानंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मनसे नेते बाबू वागसकरांवर थेट आरोप केलेत. माझ्याबाबत पक्षामध्ये ज्या काही घटना घडतायत त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार असल्याचं स्पष्ट विधान मोरेंनी केलं आणि मोरेंसारख्या शहरातील इतक्या मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढवणारे हे वागस्कर नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला.
कोण आहेत बाबू वागसकर?
- राज ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी बाबू वागसकरांची ओळख
- राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून खांद्याला खांदा लावून काम
- २००७ आणि २०१२ ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम
- २०१२ ला कोरेगाव पार्क भागातून बाबू वागसकर आणि पत्नी वनिता वागसकर मनपामध्ये विजयी
- रुपाली पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर वनिता वागसकरांची मनसेच्या महिला शहराध्यक्षपदी निवड
- इतकंच नव्हे तर शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावेळी वागसकर शेजारीच
- तेव्हापासून बाबू वागस्कर हे राज ठाकरेंचे विश्वासू साथीदार
आता मुख्य म्हणजे बाबू वागसकर हे फक्त राज ठाकरेंच्याच नव्हे तर स्वत: वसंत मोरेंच्याही चांगल्या संपर्कात असलेलेच नेते होते. पण मग अचानक ते मोरेंच्या नाराजीचं मुख्य कारण कसे बनले?
- वसंत मोरे आणि बाबू वागसकर हे पुण्यातील मनसेचे वजनदार नेते
- वागसकर आणि वसंत मोरेंचं महापालिका सभागृहात एकत्र काम
- मात्र, कालांतराने वागसकरांचं पक्षातील वजन वाढल्याने मोरे बॅकफूटला
- राज ठाकरेंच्या भोंग्यांविरोधी भूमिकेशी वसंत मोरेंकडून फारकत
- पुढे, वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय
- त्यानंतर, मोरेंकडून वारंवार शहर कोअर कमिटी आपल्याला डावलत असल्याचा आरोप
- त्यात, कोअर कमिटीमध्ये प्रामुख्याने बाबू वागसकरांवर वसंत मोरेंचा आक्षेप
- हडपसर विधानसभा मतदारसंघात मोरे मनसेचं प्रतिनिधित्व करतात
- परंतु, त्याच मतदारसंघात वागसकर बैठका घेऊन आपल्याला डावलत असल्याचा मोरेंचा आरोप
- येरवड्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलण्याची संधी न दिल्याने मोरेंची नाराजी
- पक्षात निर्माण झालेल्या तणावाला वागसकर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतरही मोरे आणि वागसकरांमधील हा वाद मिटत नसल्याने आता स्वतः राज ठाकरे हेच येत्या २ दिवसांत याबाबत फायनल निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. अजितदादांच्या ऑफरमुळे एकीकडे वसंत मोरेंच्या पक्षबदलाच्या चर्चा रंगत असताना आता वागसकरांसोबतचा हा वाद न मिटल्यास मोरे मोठे निर्णय घेणार की राज ठाकरे ह्या नेत्यांची समजूत घालून हा वाद मिटवू शकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.