पुणे :छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधाननंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी येत्या १३ डिसेंबर रोजी पुणे बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्याचे काम झाले आहे. त्याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान केले आहे. या विधानाला जवळपास महिना होत आले, तरी देखील राज्यपालांवर भाजपचे नेतृत्व कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. ही निषेधार्थ बाब आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- सीमावादाचे पडसाद संसदेत; खासदार आक्रमक, सभापती ओम बिर्ला यांच्या या विधानाने आश्चर्य

या घटनेच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुणे बंदचा निर्णय सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने एक बैठक घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविले जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- विखे पाटील- बाळासाहेब थोरात संघर्ष; हे उघड्या डोळ्यांनी पाहायचे का?, विखेंचे थोरातांना उत्तर

Pune Bandh on 13 December

१३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक

३०० मशीदींमध्ये पुणे बंदसाठी आवाहन

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी मुस्लिम संघटनांचाही पुढाकार घेतला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में हर मुस्लिम मैदान में’ अशी घोषणा देत पुण्यातील ३०० मशीदीमध्ये पुणे बंदसाठी आवाहन करणारअसल्याची माहिती मुस्लिम मूलनिवासी मंचचे अंजुम इनामदार यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- सीमवादाचे सोलापुरात तीव्र पडसाद; कर्नाटकच्या बस अडवून फासले काळे, वाहक-चालकांचा असा केला सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here