दरम्यान, घटना घडताच नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमी बस चालकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. उड्डाणपूलावर अडकलेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. यामध्ये बसच्या पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास नां पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करत आहेत.
st bus accident news, एसटी बसला भीषण अपघात: पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला, ३२ प्रवासी थोडक्यात बचावले! – aurangabad nagpur st bus accident passenger survives as bus gets stuck on bridge
अमरावती : औरंगाबादकडून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसला नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून यामध्ये बसचालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने सदर बसमधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आणि जखमी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.