याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथून शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर काही विद्यार्थिनी मानव विकास मिशनच्या बसने औंढा नागनाथकडे निघाल्या होत्या. यावेळी लिंबाळा येथून एका दुचाकीवर असलेल्या तीन रोडरोमियोंनी दुचाकी वाहनावरून बसचा पाठलाग सुरू केला. बसजवळ गेल्यानंतर त्यांनी बसमधील विद्यार्थिनींना अश्लील टॉंट मारण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, सदर बस डिग्रस पाटीजवळ पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी खाली उतरल्या. यावेळी त्या रोडरोमीयोंनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी जमा झालेल्या जमावाने त्यांना जाब विचारला. त्यानंतर या रोडरोमियोंना बेदम झोडपून काढले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडितकर, संतोष वाठोरे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुचाकीवरील तिघांना ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर विद्यार्थिनी व जमाव देखील पोलीस ठाण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा-
मागील चार ते पाच दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
क्लिक करा आणि वाचा-