मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यानंतर शिवसेनेचे नेते, खासदार आता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांची मुलाखत घेणार आहेत. ‘काय म्हणतंय ठाकरे सरकार?’ अशी कॅचलाइन देत राऊत यांनी या मुलाखतीचा पहिला प्रोमो आज ट्विट केला आहे.

वाचा:

येत्या २५ व २६ जुलै रोजी दोन भागांत शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. यापूर्वी उद्धव यांनी ‘सामना’ला अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, त्या मुलाखती एका पक्षाचे प्रमुख म्हणून होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत असल्यामुळं राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी महाआघाडी केली. त्यानंतर गेले सुमारे आठ महिने उद्धव ठाकरे हे या पक्षांच्या सोबत राज्याचे सरकार चालवत आहेत. वेगळ्या विचारांच्या या पक्षांसोबत उद्धव ठाकरे यांचा अनुभव नेमका कसा आहे, हे या मुलाखतीतून स्पष्ट होणार आहे.

वाचा:

शरद पवार यांनी नुकतीच ‘सामना’ला प्रदीर्घ मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी राजकीय व आर्थिक प्रश्नांवर आपली मतं व्यक्त केली होती. महाविकास आघाडीतील समन्वयाच्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी उद्धव ठाकरे यांना संवादावर भर देण्याचा सल्ला दिला होता. पवार यांच्या सल्ल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना काय वाटतं?, महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे म्हणजे नेमकं काय आहे? विरोधक म्हणून भाजपकडे ते कसं पाहतात?,’ अशा अनेक प्रश्नांची उत्तर या मुलाखतीतून मिळण्याची शक्यता आहे.

अयोध्येला जाणार का?

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकारनं निश्चित केली आहे. येत्या ५ ऑगस्टला भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याविषयी सध्या देशभरात चर्चा आहे. त्याबद्दल ठाकरे नेमकं काय सांगतात याचीही उत्सुकता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here