महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद सध्या पेटला आहे. दोन्ही राज्यात तणावाची स्थिती आहे. यावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गदारोळ झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या खासदारांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून चर्चा केली. असं असताना महाराष्ट्र सरकाच्या एक निर्णयान हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत.

हायलाइट्स:
- कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर होत असलेली दगडफेक
- महाराष्ट्र कर्नाटकात सीमावादावरून तणाव
- मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहांशी चर्चा
- तणावामुळे दोन्ही राज्यातील एसटी बससेवा बंद
राज्य सरकारतर्फे विविध विभागांच्या योजना चालविण्यासाठी सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी बँकेत खाते उघडण्याची अनुमती दिली जाते. सरकारचे असे खाते त्या त्या विभागाचे आहरण व संवितरण (ड्रॉइंग अँड डिसबर्सिंग) अधिकारी चालवत असतात. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाच्या नियोजनासाठी या बँकांना सरकारशी करार करावे लागतात. त्यानुसार आत्तापर्यंत एकूण १५ बँकांशी सरकारचे करार करण्यात आले आहेत. त्यात आता आणखी तीन बँकांची भर पडली असून या बँकांशी नवा करार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नव्या बँकांमध्ये कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अशा तीन बँकांचा समावेश करण्यात आला आहे. तशी घोषणा वित्त विभागाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे केली. या शासन निर्णयानुसार कर्नाटक बँकेने नुकताच राज्य सरकारशी करार केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यांच्यासाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांना कर्नाटक बँकेत खाते उघडण्याची मुभा मिळणार आहे. तसेच निवृत्तीवेतन प्रदान करण्यासंदर्भातही कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खाते कर्नाटक बँकेत उघडण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे.
पवारांचा अल्टिमेटम: देवेंद्र फडणवीसांकडून तातडीने अमित शहांना फोन; सीमाप्रश्नी
कर्नाटकच्या CM ने तोंडावर आवर घालावा, आव्हानाची भाषा असेल तर मराठी जनता तयार :
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.