कच्च्या तेलाच्या किंमतींत घट
भारतासाठी मोठा दिलासा देणारी बातमी असून कच्च्या तेलाची किंमत २०२२ च्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चढलेल्या भावनांमुळे ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली घसरली आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ७८.६५ डॉलरवर व्यापार करत आहे. त्यामुळे WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल ७३.४९ डॉलरपर्यंत घसरली आहे. रशियाने युक्रेनमध्ये “स्पेशल ऑपरेशन” सुरू केल्यानंतर मार्चमध्ये तेल प्रति बॅरल सुमारे १४० डॉलरपर्यंत वाढले होते.
२१ मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती, तेव्हापासून इंधनदरात कोणताही बदल झाला नसून देशात तेलाच्या किमती स्थिर आहेत. विशेष म्हणजे, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमतींबद्दल बोलायचे झाले तर मायानगरी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.
मेट्रो शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई: पेट्रोलची किंमत: १०६.३१ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ९४.२७ प्रति लिटर
दिल्ली: पेट्रोलची किंमत: ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ८९.६२ रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल: १०१.९४ रुपये प्रति लिटर, डिझेल: ८७.८९ रुपये प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोलची किंमत: १०२.६३ रुपये प्रति लिटर, डिझेलची किंमत: ९४.२४ रुपये प्रति लिटर
अलीकडेच इंधनाच्या दरांत घट झाली आहे. जगातील सर्वात मोठा क्रूड आयातदार असलेल्या चीनने करोना संसर्ग सुरू झाल्यापासून त्याच्या अँटी-कोविड धोरणात सर्वात मोठे बदल जाहीर केले. नोव्हेंबरमध्ये देशातील कच्च्या तेलाची आयात एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून १० महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते.