म. टा. प्रतिनिधी, : पत्नीने मुलीला दूध पाजण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत घडला आहे. आरोपीने पत्नी बाथरूममध्ये पडून तिला मार लागल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

भिवंडीतील पूर्णा भागात प्रणाम कॉम्प्लेक्समध्ये कुटुंबासह राहणारा भजनसिंग जाधव (२५) मूळचा मध्यप्रदेशचा आहे. तो पुजारी आहे. रविवारी पहाटे ४ वाजता एक वर्षाची मुलगी झोपेतून उठली. तिला भूक लागल्याने भजनसिंग याने पत्नी पूजा (२३) हिला मुलीला दूध पाजण्याविषयी सांगितले. परंतु तिने नकार दिल्याने या दाम्पत्यामध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात भजनसिंग याने पंख्याच्या लोखंडी प्लेटने पत्नीला मारहाण केली. पहाटे हा प्रकार घडला.

आरोपीने सकाळी ९.३० वाजता नातेवाईकांना बोलवून पत्नीला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. परंतु सुरुवातीला भजनसिंग याने बनाव रचत पत्नी बाथरूममध्ये पडल्याने तिला लागल्याचे सांगितले. परंतु पूजा हिला झालेल्या जखमा बघितल्यानंतर पोलिसांना संशय आला. भजनसिंग याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. मुलीला दूध पाजण्यावरून हा प्रकार घडला असला तरी आणखी काही कारण आहे का?, याची पोलिस चौकशी करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here