मुंबई: निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक लाल चिन्हावर उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित घसरण दिसून आली. आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक या निफ्टीमधील समभागांनी वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी एसबीआय लाईफ, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार सकाळी ९.०० वाजताच्या आकडेवारीनुसार भाजप १२२ जागांवर आघाडीवर असून ५७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. विशेषत: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांदरम्यान शेअर बाजाराची काय प्रतिक्रिया असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असेल.

टाटा समूहाचा शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना होणार मजबूत नफा, जाणून घ्या सविस्तर तपशील
सेन्सेक्स चौथ्या दिवशीही घसरला
दुसरीकडे, बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढला आणि सलग चौथ्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टीलच्या समभागांची विक्री करण्याबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने देशांतर्गत बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील कमकुवत कामगिरीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही झाला.

गुंतवणूकदारांच्या कामाची बातमी! शॉर्ट टर्म गुंतवणुकीत मिळेल खात्रीशीर परतावा, या स्टॉक्सवर नजर टाका
आयपीओची लिस्टिंग
धर्मज क्रॉप गार्ड आयपीओ आज बाजारात सूचीबद्ध होत आहे. आणि मार्केटमध्ये आयपीओची दमदार लिस्टिंग होईल, असे मानले जात आहे. ग्रे मार्केटमध्ये धर्मज क्रॉप गार्डच्या शेअर्सची क्रेझ पाहायला मिळाली. धर्मज क्रॉप गार्डने २५१ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर २१६-२३७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.

एका शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; तीन वर्षात मल्टीबॅगर परतावा, आता देणार बोनस शेअरचे गिफ्ट!
आशियाई-अमेरिकन बाजार घसरला
हँगसेंग आणि स्ट्रेट टाइम्स वगळता बहुतांश आशियाई शेअर बाजार सकाळी घसरणीसह व्यवहार करत आहेत. शांघाय कंपोझिट, जकार्ता, कोस्पी निर्देशनकत सकाळी घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. नॅसडॅक ५६ अंकांनी घसरून बंद झाला, तर डाऊ जोन्स १.५८ अंकांच्या किंचित वाढीसह बंद झाला.

प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची सुरुवात
बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात बीएसईचा ३० समभागांचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स बुधवारी ९३ अंकांच्या वाढीसह ६२,५०४ च्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने १० अंकांनी वाढत १८,५७० च्या पातळीवर व्यवहार सुरु केला. यानंतर सेन्सेक्स ३८ अंकांनी घसरून ६२,३७२ वर, तर निफ्टी ५ अंकांनी घसरून १८,५५४ वर व्यवहार करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here