संजय राऊत वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांना आलेला फोन खरा होता की खोटा याचा तपास केला जाईल. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल, असं भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली. जामिनीवर बाहेर आल्यानंतर राऊत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली नाही.
माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं राऊत म्हणाले आहेत. राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली. त्यामागे सरकारचा हात नाही. पोलीस यंत्रणेची समिती याबद्दलचे निर्णय घेते. त्यात आयपीएस अधिकारी, गृह सचिव, डीजींचा समावेश असतो. सुरक्षासंबंधीचे अहवाल पाहून त्यांच्याकडून कोणाला सुरक्षा पुरवायची, याबद्दलचा निर्णय होत असतो, असं लाड म्हणाले.
Home Maharashtra sanjay raut, ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन; धमकीमागे नेमकं...
sanjay raut, ‘त्या’ मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांना धमकीचे २ फोन; धमकीमागे नेमकं कोण? – mp sanjay raut gets threatening calls after minister shambhuraj desai warns him over maharashtra karnataka border dispute
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले आहेत. काल दिवसभरात राऊत यांना धमकीचे दोन फोन आले. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आले. सीमाप्रश्न पेटला असताना राऊत यांनी काल शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. बेळगावमध्ये जाणारच. कन्नडिगांना राज्य सरकारनं उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले होते. यानंतर कन्नडिगांकडून राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. कर्नाटकात येऊन दाखवा, असा धमकीवजा इशारा राऊतांना देण्यात आला.