न्यूयॉर्क: जगभरात भारतीयांचा डंका वाजत आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असो किंवा अब्जाधीशांची यादी… सर्वांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्येही भारतीयांचा दबदबा कायम आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सहा भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या जागतिक १०० सर्वात शक्तिशाली महिला २०२२ च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारतीय अर्थमंत्र्यांचे स्थान वाढले
फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी एका स्थानाची उडी घेत ३६ वे स्थान मिळाले आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ च्या यादीत सीतारामन ३७व्या स्थानावर होत्या तर, २०२० मध्ये ४१व्या आणि २०१९ मध्ये ३४व्या सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या होत्या. विशेष म्हणजे भारतीय अर्थमंत्र्यांनी सलग चौथ्यांदा या यादीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Elon Musk सिंहासनावरून पायउतार; सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता हा अब्जाधीश जगात अतिश्रीमंत
इतर महिला कोण
अर्थमंत्री निर्मला यांच्यासोबत फोर्ब्सच्या यादीत भारतीय महिलांमध्ये बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ आणि नायका संस्थापक फाल्गुनी नायर यांचाही समावेश झाला आहे. यादीत दोघी दिग्गज महिला अनुक्रमे ७२व्या आणि ८९व्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, २०२१ च्या यादीत फाल्गुनी नायर ८८व्या स्थानावर होत्या म्हणजेच, ते एका स्थानावरून खाली घसरले आहेत, परंतु यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या.

Forbes Asia Philanthropy List: फक्त कमाईतच नव्हे तर अदानींची दानतही मोठी; केलं ६० हजार कोटींचं दान
तसेच HCL टेकच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा फोर्ब्सच्या यादीत ५३व्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच, जगातील ५४ व्या सर्वात शक्तिशाली महिला बनल्या आहेत. याशिवाय यादीतील पुढचे भारतीय नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) अध्यक्षा सोमा मंडल ६७ वा क्रमांक पटकावला आहे.

पतीचा वारसा पुढे नेणार! अब्जाधीशांच्या यादीत राकेश झुनझुनवालांच्या पत्नीची एन्ट्री, पाहा किती आहे एकूण संपत्ती
जगातील सर्वात श्रीमंत महिला
फोर्ब्सच्या विशेष यादीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, जगातील सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उर्सुलाच्या नेतृत्वाव्यतिरिक्त कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी अव्वल स्थान मिळवले होते.

या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टीन लगार्ड यांनी दुसरे तर भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली महिला बनल्या आहेत. फोर्ब्सच्या यादीतील विशेष बाब म्हणजे यामध्ये ३९ सीईओ आणि १९ राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. याशिवाय ११ अशा अब्जाधीशांचाही समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती ११५ अब्ज डॉलर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here