दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोने ६६,१४३ रुपये प्रति किलोवर उघडले. यानंतर सोन्याच भाव आतापर्यंतचा उच्चांक ६६,२५८ वर पोहोचला आहे. त्याच वेळी, ११:३० वाजता चांदी प्रति किलो ६६,१२६ रुपये होती, तर काल चांदीचा भाव ८५६ रुपयांनी वाढून ६६,२७० रुपयांवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती काय?
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव वाढीसह व्यवहार करत आहे. आज सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत ०.७१ टक्क्यांनी वाढून १,७८३.७५ डॉलर प्रति औंस झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही ०.४४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सध्या चंची २२.६३ डॉलर प्रति औंस वर व्यापार करत आहे. गेल्या एक महिन्यात चांदीच्या किमतीत जबरदस्त वाढून ३.७४ टक्क्यांनी महागली आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या…
लग्नसराईच्या या मोसमात तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. लोकांनी सोने खरेदी करण्यापूर्वी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आयएसआय) त्यावर केलेले हॉलमार्क चिन्ह तपासण्याचा सल्ला दिला आहे. हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा देते. तर तुम्ही २४ कॅरेट, २२ कॅरेट, २० कॅरेट किंवा १८ कॅरेटचे सोने खरेदी करत आहात तसेच मेकिंग चार्ज सारख्या हे देखील खरेदीपूर्वी तपासून पाहा. याशिवाय तुम्ही सोन्याची किंमतही तपासली पाहिजे.