अमेरिकन रक्त तपासणी स्टार्टअप कंपनी, थेरनोस, फसवणूक प्रकरणी भारतीय वंशाच्या रमेश ‘सनी’ बलवानी यांना अमेरिकन कोर्टाने १३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सनी बलवानी आणि त्याची गर्लफ्रेंड व अमेरिकन स्टार एलिझाबेथ होटल्सने गुंतवणूकदारांची तसेच पीडितांची फसवणूक केली. थेरनोसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) बलवानी यांना न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरलावले आणि १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर एलिझाबेथ होल्म्सला गेल्या महिन्यात ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या फसवणुकीची आणि सनी बलवानीच्या भारत कनेक्शनची संपूर्ण कहाणी खालीलप्रमाणे जाणून घेऊया.
१९ वर्ष लहान गर्लफ्रेंड
बलवानी आणि एलिझाबेथ यांची भेट २००३ मध्ये झाली होती. त्यावेळी सनी बलवानी ३७ तर एलिझाबेथ होल्म्स फक्त १९ वर्षांची होती. एलिझाबेथ ही अमेरिकेची उदयोन्मुख अभिनेत्री होती. भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००५ ते २०१७ पर्यंत दोघेही एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे दोघांनी आपले संबंध कंपनीतील गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांपासून लपवून ठेवले.
बलवानी आणि एलिझाबेथ यांनी मिळून २००३ मध्ये थेरॅनोस नावाच्या कंपनीचा सुरु केली. त्यांची कंपनी चाचणी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा दावा दोघांनी केली. यानंतर कंपनीकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण आणखी वाढले आणि लाखो डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित केली. काही वर्षातच त्यांची स्टार्टअप कंपनीचे मूल्य १ बिलियन डॉलरवर पोहोचले. याच काळात एलिझाबेथची वैयक्तिक मालमत्ता ८० लाख कोटी रुपयांवर तर, बलवानीची संपत्तीही ८५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली.
भारताशी संबंध काय?
आता अनेक जण सनी बलवानीचा भारताशी संबंध काय याबाबत विचार करत आहेत. सनी बलवानीचा जन्म १९६५ मध्ये पाकिस्तानच्या सिंधमध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लाहोरमध्ये झाले, पण नंतर पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांच्या अडचणी वाढत होत्या, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने भारतात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले.
टेक्सास विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर बलवानी १९८७ मध्ये नोकरीत रुजू झाले, परंतु त्यांना नोकरीमध्ये रस आला नाही आणि त्यानंतर त्यांनी छोट्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान २००३ मध्ये त्यांची एलिझाबेथशी भेट झाली. पण मूळचा रमेश बलवानी ते सनी बलवानीपर्यंत प्रवास कसा झाला, याची अद्याप कोणालाही माहित नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, घटस्फोटाच्या कागदावर सनी बलवानीचे नाव रमेश बलवानी आहे.