मुंबई: आघाडीची वाईन बनवणारी कंपनी सुला वाइनयार्ड्स आपला आयपीओ आणणार असून कंपनीने या आयपीओसाठी ३४०-३५७ रुपयांचा प्राइस बँड ठेवला आहे. कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून ९६० कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा आयपीओ १२ डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि १४ डिसेंबरला बंद होईल.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी ९ डिसेंबर रोजी खुला होईल. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. या अंतर्गत, प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांद्वारे एकूण २६,९००,५३२ इक्विटी शेअर्स विकले जातील.

IPO असावा तर असा! गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार फायदा; शेअरमागे १७ टक्के नफा
आयपीओशी संबंधित सर्व तपशील
ओएफएस अंतर्गत शेअर्स विकणाऱ्यांमध्ये प्रवर्तक, संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत आणि कोफिनट्रा, हेस्टॅक इन्वेस्टमेंट्स लिमिटेड, सामा कॅपिटल III, लिमिटेड, एसडब्ल्यूआईपी होल्डिंग्स लिमिटेड, वर्लिन्वेस्ट एसए आणि वर्लिन्वेस्ट फ्रांस एसए सारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. अप्पर प्राइस बँडनुसार, आयपीओला ९६०.३५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

सुला वाइनयार्डच्या आयपीओचीचे लॉट साइज ४२ शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदार १३ लॉटपर्यंत अर्ज करू शकतात. याचा अर्थ जास्तीत जास्त ५४६ शेअर्स खरेदी केले जाऊ शकतात किंवा १९४,९२२ रुपये गुंतवले जाऊ शकतात. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, CLSA इंडिया आणि आयआयएफएल सिक्युरिटीज हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये या IPO ची क्रेझ, तिसऱ्या दिवशी २५ पट सबस्क्राइब; ग्रे बाजारातही बोलबाला
कंपनी तपशील
सुला व्हाइनयार्ड्स लाल, पांढर्‍या आणि स्पार्कलिंग वाइन उत्पादनात आघाडीवर आहे. कंपनी सुला, रासा, दिंडोरी, द सोर्स, सातोरी, मदेरा आणि दिया या ब्रँड नावाने वाईन विकते. हे १३ ब्रँडच्या ५६ वेगवेगळ्या लेबल केलेल्या वाइन तयार करते. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्यांच्या मालकीच्या चार आणि दोन भाडेतत्त्वावर उत्पादन कारखाने आहेत.

पैसे तयार ठेवा! आणखी २ IPO ना सेबीचा हिरवा कंदील, घ्या जाणून संपूर्ण तपशील
नाशिकची ही वाईन कंपनी देशातील सर्वात वेगाने वाढणारी अल्कोहोलिक बेव्हरेज कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा करानंतरचा नफा ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहा महिन्यांत अनेक पटींनी वाढून ३०.५१ कोटी झाला, जो एका वर्षापूर्वी रु. ४.५३ कोटी होता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कामकाजातील महसूल मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील १५९.१५ कोटी रुपयांच्या तुलनेत ४०.८ टक्क्यांनी वाढून २२४.०७ कोटी रुपये झाला.

रिलायन्स कॅपिटलची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेसने २०१८ मध्ये सुला विनयार्ड्समधील १९.०५ टक्के हिस्सा २५६ कोटी रुपयांना विकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here