Himachal Pradesh, असे काय झाले की हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव झाला?; हे महत्त्वाचे मुद्दे ठरले निर्णायक – old pension scheme agniveer tourism and free electricity assurance by congress know the main reasons of bjp defeat in himachal pradesh
शिमला :हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवात भाजपच्या ८ मंत्र्यांनाही आपली जागा वाचवता आलेली नाही. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही पराभव स्वीकारत काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला हिमाचलच्या जनतेने का नाकारले, असा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हिमाचल प्रदेशातील जनतेने भाजपला दुसरी संधी दिली नाही याची ठळक अशी कारणे काय आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच कारणांचा फायदा घेत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट होत आहे.
हिमाचलमध्ये ओपीएसचा मुद्दा सर्वात मोठा होता. कारण येथील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २ लाख ७५ हजार इतकी आहे. आकडेवारी पाहिली असता हिमाचल प्रदेशातील सुमारे १.५ लाख कर्मचारी नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत. राज्याच्या आर्थिक स्थितीचा दाखला देत भाजपने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याचवेळी आप आणि काँग्रेसने सत्तेत आल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या मुद्द्याचा फायदा काँग्रेसने घेतला आणि त्याचा फायदा त्यांना झाला हे स्पष्ट होत आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा अन्यथा महाराष्ट्र बंद होईल : संभाजीराजे छत्रपती यांचा सूचक इशारा अग्निवीर योजनेमुळेही झाले नुकसान
अग्निवीर योजनेमुळे हिमाचलमध्ये भाजपचे नुकसान झाले असे म्हणता येते. ही योजना जेव्हा संपूर्ण देशात लागू झाली तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये याला प्रचंड विरोध झाला. सैन्य हे राज्यातील रोजगाराचे सर्वोत्तम माध्यम आहे, असे हिमाचल प्रदेशातील तरुण मानतो. अग्निवीर योजना राबवून सरकार तरुणांचे भविष्य खराब करत असल्याचे इथल्या तरुणांना वाटते. या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरले होते. याचा आता त्यांना फायदा होताना दिसत आहे.
भाजपच्या पराभवाचे एक कारण काळ असेही सांगता येईल. हिमाचलमध्ये पर्यटन हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, परंतु येथील पर्यटन कोरोनाच्या काळात पूर्णपणे ठप्प झाला होता. या काळात सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिल्याचे दिसत नाही. दरम्यान, महागाई आणि बेरोजगारीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेत सरकारविरोधात नाराजी दिसून आली.
या बरोबरच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिलेली आकर्षक आश्वासनेही भाजपच्या पराभवाचे कारण ठरली. काँग्रेसने हिमाचलमध्ये विजेसंदर्भात दिलेले आश्वासन जनतेला आवडल्याचे दिसते. येथे काँग्रेसने ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते.