himachal pradesh election result: भाजपनं हिमाचल प्रदेशातील पराभव स्वीकारला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर थोड्याच वेळात राज्यपालांकडे राजीनामा देणार आहेत. बहुमत मिळाल्यानंतरही काँग्रेसला आमदारांच्या पळवापळवीची भीती वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्त्वानं छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि हिमाचलचे पर्यवेक्षक भूपेश बघेल यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

चंदिगढमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक होईल. या बैठकीत पुढील रणनीती ठरेल. त्यानंतर आमदारांना राजस्थान किंवा छत्तीसगडला शिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदारांना नेण्याची, त्यांना परत आणण्याची जबाबदारी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांना देण्यात आली आहे.
काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती बघेल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्यामुळे बघेल चंदिगढ गाठणार आहेत. त्यांच्यासोबत राजीव शुक्लादेखील असतील. भूपेंद्र सिंह हुड्डा आधीपासूनच चंदिगढमध्ये आहेत. आम्ही आमच्या आमदारांना चंदिगढला पाठवत आहोत. भाजपकडून खरेदीचे प्रयत्न होऊ नयेत यासाठी आम्ही खिडकी दरवाजे बंद केले आहेत, असं काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी तजिंदर सिंह बिट्टू म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.