कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अनुज असं मृत मुलाचं नाव असून तो बिल्हौरचा रहिवासी आहे. बीआयसी मैदानात क्रिकेट खेळताना अनुज अचानक कोसळला.
अनुज निपचित पडल्याचं पाहून मित्रांनी त्याला बिल्हौर सीएचसीला घेऊन गेले. अनुजच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. रुग्णालयात डॉक्टरांनी अनुजला मृत घोषित केलं. अनुजला रुग्णालयात आणताच आम्ही त्याची तपासणी केली. त्याचे ओठ निळे पडले होते. त्याची नाडी बंद पडली होती. त्याला हृदय विकाराचा झटका आला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.